माझी मैत्रीण गौरी जोशी-देशमुख हिच्या आईने लिहीलेली सुंदर कविता…

मला आवडणारी एक
हिशेबाची वही होती
दैनदिन जमाखर्चाची त्यात
बेरीज-वजाबाकी होती

तेलातुपाची किंमत
आसवांपेक्षा जास्त होती
भाजलेल्या बोटांना
दह्या-दुधाची जाण होती

गहू-हरभरा-तांदूळ-ज्वारी
आपआ पल्या जागी होती
मनामधल्या कप्प्यांमध्ये
अजून जागा बाकी होती

तू दिलेल्या रकमेतून
अजून काही शिल्लक होती
आणलेल्या भाज्यांसारखी
जखम अजून ताजी होती

आभासलेल्या जीवनातील
ही एक वास्तविकता होती
हिशेबाच्या वहीत मी
एक कविता लिहिली होती

हिशेबाच्या ओळी, चार ओळी
हा माझा पाहिला कविता संग्रह
नेहा जोशी माझे नाव वय 54
लोकमत मीडिया प्रा. ली. मधे इवेंट एग्जीक्यूटिव म्हणून 18 वर्षांपासून कार्यरत ,आतापावेतो 2000 च्या वर इवेंट्स चे आयोजन, संचालन, आणि एग्झूकेशन, अनेक राज्यस्तरीय इवेन्ट मधे संचालन , मासिके, व्रुत्तपत्रामधे लेखमाला,कविता प्रकाशित, अनेक मानाचे पुरस्कार ,नुकताच भाऊ कदम यांचे हस्ते मनोरंजनातून समाजकार्य याकरिता विशेष पुरस्कार मिळाला




Loading